I dont need a Career Counselor.. I know what to do..

 






आई..मला CA नाही व्हायचे..  intermediate परीक्षा नाही  द्यावीशी वाटत मला .. सानिकाने आईवर बॉम्ब टाकला ..

काय ?

तू ठीक आहेस ना ? कविताने भाजी  चिरता चिरता चाकू खाली ठेवला आणि हबकलेल्या चेहऱ्याने सानिका कडे  बघितले.. 

सानिका अगं काय बोलतेयस.. काय झाले ?

आई मला नाही करावासा वाटत CA  चा अभ्यास आता. मनच लागत नाहये माझे .. बऱ्याच गोष्टी समजायला अवघड  जाताहेत. 

हे बघ सानू.. धीर सोडू नकोस . अगं तू गेले तीन वर्षे अथक प्रयत्न करते आहेस.  फाउंडेशन ला तुला किती चांगले मार्क पडले होते. मागचा इंटरचा attempt सुद्धा फक्त काही मारकांनी हुकला.. अजून थोडा जोर लावलास तर होशील तू CA.. 

नाही पण आता मला वाटते CA होण्यात आणि आयुष्यभर ते काम करण्यात मला अजिबात आनंद मिळणार नाही.. I won't be happy .. I will lead a stressful life .. सानिका कचरत बोलून गेली .. 

अगं पण तूच ठाम होतीस ११वी मध्ये ..मला CA करायचंय म्हणून .. तुझे पप्पा तू science घेऊन इंजिनिअर व्हावी म्हणून किती मागे लागले होते तुझ्या .. पण तुझ्या हट्टापुढे ते नमले .. आता ते काय म्हणतील ? किती चिडतील ते ..?

हो पण.. I am sorry... सानिका खाली मान घालून तिच्या रूम मध्ये निघून गेली . 

अगं... सानू दार उघड.. 

बरं ऐक,  नको करू CA... पण अशी दार लावून रुसून बसू नकोस... कविताला रडू आले होते.. 

मी झोपतेय थोडा वेळ.. आतून सानिकाने  थोडेसे चिडून च सांगितले .. 

बरं.. कविताला थोडे हायसे वाटले .. 

CA व्हायचे असे  तिनेच ठरवले होते ..आणि फाऊंडेशनला चांगले मार्क मिळाल्यामुळे तिचा आत्मविश्वास देखील वाढला होता.. 

विकासने देखील त्याचा हट्ट सोडून तिला घाटकोपरच्या एका उत्तम class मध्ये 1  lakh फी भरून तिला क्लास लावला होता . सुरवातीला वर्षभर local ने दररोज ती  ठाण्यावरून घाटकोपरला जात होती. खूप मेहनत घेत होती.इंटर च्या पहिल्या attempt  चा result आला तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसला. 

हुशार Brilliant अशा विशेषणांनी सतत नावाजलेली सानिका CA intermediate परीक्षेत fail झाली होती.. केवळ काही मारकानी म्हणजे अगदी 2-3   मारकानी.. ३ विषय राहिले होते

तरी विकास आणि कविता तिला काहीच बोलले नाहीत . उलट तिला त्यांनी motivate केले. नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न कर असे सांगितले . तिने सुद्धा पुन्हा अभ्यास सुरू केला होता ..आता pandemic मुळे classes online होते..पण जस जसा वेळ जात होता तिचा इंटरेस्ट कमी कमी होत होता .  अभ्यासाला बसायचीच भीती वाटू लागली तिला. 

कविताच्या हे लक्षात यायला लागले होते.. एकदा आपण तिच्याशी बोलू असे तिने ठरवले देखील होते .. 

पण तेव्हढ्यात.. 

परीक्षा दीड महिन्यावर आली होती आणि तिचे  अवसान गळाले होते .. 

कविताला चिंता लागली होती विकास कसा react करेल. त्याचा  तापट स्वभाव , मागच्या वेळी fail झाली तेव्हा कविताने कसेतरी त्याला शांत केले होते .. तरुण मुलीचा मामला होता .. त्याने देखील तेव्हा सामंजस्याने घेतले होते.

पण आता.. CA नाही करायचे म्हटल्यावर त्याचा संताप होईल.. ३ वर्षे आणि जवळपास ३ लाख रुपये खर्च केले होते .. त्याला कसे सांगू.. त्याला कसे  आवरू... रागाच्या भरात मुलीवर हात उचलू नये त्याने .. 

ती डोके धरून बसली होती .. 

"तुम्ही मुळात CA करायचं हा निर्णय का घेतला होता ?"

अविनाश ने तिघांना उद्देशून सहज प्रश्न विचारला . सनिकाचा detailed Psychometric report  बघून झाल्यावर समोर बसलेल्या तिघांसाठी हा पहिलाच प्रश्न होता .. 

त्यापूर्वी कविताने सर्व story अविनाशला फोन वरूनच थोडक्यात सांगितली होती आणि त्याने  पाठवलेली psychometric test देखील सानिकाला द्यायला लावली होती .. सानिकाचा आणि तिच्या त्या  संवादाला जवळपास ८ दिवस झाले होते.

विकास पटकन बोलणार तेवढ्यात अविनाश ने त्याला गप्प बसण्याचा इशारा केला .. त्याने बघितले की सानिका बोलण्यास सुरुवात करत होती .

थोडेसे बिचकतच आणि संकोचाने सानिका बोलू लागली .."Actually मला Engg आणि medicine ला जायचे नव्हते.  तेव्हा CA  option चांगला वाटला . सोशल status , Financial opportunity चांगली आहे असे माझ्या मित्रांनी आणि माझ्या मैत्रिणीच्या बाबांनी सुद्धा सांगितले होते . शिवाय मला maths चा काही problem नव्हता. मला वाटले होते जमेल मला CA करायला.. But I was wrong . " सानिका चा प्रांजळपणा अविनाशला आवडला

सानू तुला अजूनही जमु शकते ... विकासने कदाचित शेवटचा प्रयत्न करून पाहिला

सानिकाने  मान खाली घातली .. 

"We didn't want to force our views on her and we also felt ok ..CA is good as well. म्हणून अम्हींसुद्धा तिला support केला..But now she is back tracking midway . I am really disappointed and upset .Vikas च्या आवाजात अगतिकता जाणवत होती .. Actually she is brilliant and studious . I don't understand why she is giving up . We are okay to support her till she Lands up in a CA job ... 

Hmm.. No doubt she has Talent. in fact quite a few excellent Talents ... 

She can become a CA .  तो problem नाही..Problem तिच्या personality मध्ये आहे.. अविनाश म्हणाला.. 

म्हणजे ? तिघांनी प्रश्नार्थक नजरेने एकच वेळी अविनाशकडे बघितले 

Don't worry..I will explain. 

See . Talent is like a knife and the personality is the hand that uses the knife .. 

Knife has to be sharp and hand has to be wise ..

केवळ टॅलेंट असून चालत नाही.. त्या टॅलेंटचा  वापर करणारे व्यक्तिमत्त्व  त्याचा Attitude कसा आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. 

या दोन्हींचे उत्तम कॉम्बिनेशन एका उत्तम यशस्वी करिअर साठी आवश्यक आहे. 

त्याच बरोबर अर्थात व्यक्तीचे interests , तिचा भावनिक मुल्यांक  सुद्धा तेव्हढेच महत्त्वाचे असतात .  

सानिका एखादी गोष्ट ठरवून त्याचा उत्तम पाठपुरावा करून ती तडीस नेवू शकते पण...जोंपर्यंत तिच्या मार्गात काही मोठ्या अडचणी येत नाहीत तोपर्यंत...जर काही मोठ्या अडचणी , failures किंवा अन्य stress, pressure आले तर मात्र ती गोष्ट सोडून  देण्याकडे तिचा कल आहे. 

While she has good intense pursuit ability but she falls short on Perseverance and Resilience. तिच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर , अपयशावर  मात करण्यासाठी लागणारी जिद्द आणि चिकाटी तिच्यात naturally  थोडी कमी  आहे . 

एका करिअर coach ला ज्या काही अवघड गोष्टी कराव्या लागतात त्यापैकी एक म्हणजे   मुलाच्या मर्यादा स्पष्टपणे सांगायच्या पण मुलाला किंवा पालकांना दुखवायचे नाही .. निराश तर नक्कीच होवू द्यायचे नाही ... अविनाशला आता हे हे सवयीने चांगले जणू लागले होते

गेल्या वर्षभरात तिला आणखी काही अडचणी आल्या का ? त्याने पुढे विचारले

हो actually जवळपास  सहा महिने तिला तब्येतीचे अनेक problems आले होते . त्यावेळी तिचा अभ्यास व्यवस्थित नाही झाला. कविताने काळजीच्या स्वरात सांगितले .

Hmm.. I see. सानिकाला तिच्या व्यक्तिमत्त्वावर काम करावे लागेल ..Its  a lengthy process but has to be done. 

However what I observe is SHE is more of a Management Professional or a Trainer Educator /  Rather than a  functional consultant like a CA or Engineer or Doc. . 

सनिकाचे डोळे चमकले .. चेहऱ्यावर  एक स्मित आले . 

सानिकाचे  विविध Talents, तिचे व्यवस्थापन कौशल्य , तिचे भाषा कौशल्य , तिची सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती , निर्णय क्षमता , तिचा भावनिक  मल्यांक  आणि तिचे Interests हे सगळे एकत्र बघितले तर management /Education / Training असे careers तिच्यासाठी जास्त  उपयुक्त ठरतील. 

ती या कामामध्ये सहज यशस्वी होवू शकते आणि तिला जास्त आनंद आणि समाधान मिळेल . 

You mean she should do MBA now ?  विकासने विचारले 

Why not..? It's a good idea .. she is already a BCom graduate .. 

Alternatively she can start working and grow herself in management roles faster through consistent hardwork and support from people. 

But No careers can be built without having enough Perseverance and  Resilience .विकासने एक रास्त मुद्दा मांडला..

Yes. खरे आहे.. पण आपल्याला जे चांगले जमते , ज्यामध्ये आपल्याला गोडी वाटते त्या कामात जेव्हा अडचणी  येतात तेव्हा जिद्द आणि चिकाटी वाढवून ते काम पूर्णत्वास नेणे तुलनेने सोपे नाही का ..?

अविनाश ने बघितले विकास होकारार्थी मान हलवत होता

While she needs to work on her weaknesses .. पण तिचे  करिअर हे तिच्या सर्वोत्तम गुणांवर आधारित असेल तर जास्त चांगले. तिच्यामधील कच्च्या दुव्यावर आधारित करिअर करण्यात काय अर्थ आहे . ? अविनाश ने प्रतिसादासाठी कविताकडे बघितलं..

Actually मला पहिल्यापासून तसेच वाटत होते पण तिचा ठाम निर्णय आणि विकासचा पाठिंबा बघून मी गप्प बसले . ...कविताने थोडे धाडस केले. 

पण पुन्हा हाच प्रकार repeat झाला तर? विकास ने शंका काढली ..

"नाही पप्पा , Now I have understood myself  well. मागच्या वर्षभरातील माझे  विचार आणि आजचे discussion यावरून मला माझ्या व्यक्तिमत्वाची बऱ्यापैकी ओळख झाली आहे आणि अविनाश काका म्हणताहेत ते अगदी खरे आहे. 

And I also know now that I cannot waste anymore time .. 

मी MBA चांगल्या इन्स्टिट्यूट मधून करेन . चांगला अभ्यास करेन आणि yes I will be a good manager.. I won't let you down ..सानिका अनपेक्षित पणे पण अतिशय आत्मविश्वासाने म्हणाली.. 

Pls give me one more chance ..

एव्हाना ती तिच्या पप्पा जवळ येवून थांबली होती ..विकासने उठून तिला कवेत घेतले ..

"Okay Beta I am with you. "


आपले अश्रू पुसत कविता हसून म्हणाली.

Thank you Avinash sir You saved our happiness . Our child's life..

अविनाश ने आश्वस्त पणे  काविताकडे बघून  smile केले..

गेल्या १५ दिवसातील ही अशाप्रकारची ५वी केस होती .. आणि आणखी एका तरुण भविष्याला  मार्ग दाखवायचे त्याला भाग्य लाभले होते.


Avinash Deshmukh  

Youth Coach 

for Career Guidance and development 

(सत्य घटनेवर आधारित. पात्रांची नावे बदलली आहेत)

Comments

Popular posts from this blog

Diminishing Femininity: The Problem Hitting Employment and Human Well-Being.

From Hobbies to Personal Brand: Why Profile Building is the Real Game-Changer for Youngsters

SRK.. The Personality that built the Phenomenon..