गाडी भारी आहे... पण ती जातेय कुठे?
गाडी भारी आहे... पण ती जातेय कुठे? समजा तुम्हाला पुण्याहून गोव्याला जायचं आहे. बस स्टँडवर पोहोचलात. समोर दोन बसेस आहेत. एक साधीशी बस आहे. फार काही भारी नाही. पण ती गोव्याला जातेय. आणि शेजारी एक चकचकीत Luxury Volvo उभी आहे. मस्त आरामदायी सीट्स... AC... भारी interiors... नावाजलेली Travel कंपनी... फक्त एकच Problem आहे. ती जातेय नागपूरला! तुम्ही कोणती बस निवडाल? काय मूर्खासारखा प्रश्न आहे असं वाटलं ना? कारण आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरल्यावरच आपण तिथे नेणारी शक्य तितकी चांगली गाडी शोधतो. गाडी कितीही भारी असली तरी ती आपल्याला हव्या असलेल्या दिशेने जात नसेल तर तिचा उपयोग काय? पण गंमत अशी आहे की Engineering Admission च्या वेळी अनेक हुशार विद्यार्थी आणि त्यांचे सुशिक्षित पालक नेमकं याच्या उलट वागताना दिसतात. सुरुवातीला मुलगा म्हणतो, "मला Computer Science करायचंय." मग Admission Process सुरू होते. CET/JEE Rank... Cut-offs... College Rankings... कॉलेज Brand... आणि लक्षात येतं की CSE आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये मिळत नाहीये. पण त्याच्यापेक्षा जास्त नावाजलेल्या कॉलेजमध्ये सिविल इलेक्ट्र...