Salute To Feminine Power : Navratri Day 6
तो दिवस होता 7 ऑगस्ट 2018. सकाळचे सात वाजायची ती अगदी आतुरतेने वाट बघत होती. त्याचा फोन येणार होता आणि तिला त्याला एक खूप आनंदाची बातमी सांगायची होती.
आणि फोन खणखणला.. पळत जाऊन पहिल्या रिंगलाच तिने तो उचलला "कौस्तुभ ऐक ना मला तुला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे"
तिने आनंदात सरळ बोलायला सुरुवात केली.
"गुड मॉर्निंग मॅम आर यू कनिका कौस्तुभ राणे वाइफ ऑफ मेजर कौस्तुभ राणे?"
समोरून एका अनोळखी आवाजात हे वाक्य ऐकले आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली.
कश्मीरमध्ये आर्मी ऑपरेशन मध्ये असलेल्या अधिकाऱ्याच्या बायकोला या वाक्याचा अर्थ लगेच समजला.
ज्या सकाळी ती तिच्या व्यावसायिक आयुष्याचा एक नवीन शुभारंभ करणार होती, ज्यासाठी तिने अनेक महिने स्वप्न पाहिलं होतं आणि आजपासून ती तिचे आयुष्य बदलणार होती त्या सकाळी तिचे आयुष्य नक्की बदलले सगळेच बदलले अगदी पार कोलमडून गेले
"I am sorry to inform, Maj Kaustubh Rane made his Supreme Sacrifice for the Nation early morning today.."
ती स्तब्ध झाली, निशब्द झाली कोसळली...
आपल्या नवऱ्याच्या मृत्यूची बातमी ऐकायला का ती फोनकडे पळाली होती?
एका क्षणात तिला एका खोल खोल विहिरीत पडते आहे असे वाटू लागले,
जिला तळच नाही अशा एका अंधार्या विहिरीमध्ये ती खोल खोल कोसळते आहे.. आहे असे तिला वाटू लागले.
अनेक दिवस असेच गेले. अन्न पाणी सुटले होते
तिला उभं राहणं सुद्धा मुश्किल होत होतं.
वयाच्या विसाव्या वर्षापासून ज्याच्यावर तिने खूप प्रेम केलं आणि त्यापेक्षाही जास्त ज्याने तिच्यावर जीवापाड प्रेम केलं तो कौस्तुभ अचानक गेला... तिला सोडून..
तिचा खूप संताप झाला होता...
तिने त्याला सांगितलं होतं.. "फिल्डवर
आतताईपणा करू नकोस" तरीही त्याने तो केला होता.
पळून जाणाऱ्या अतिरेक्याला पकडण्यासाठी तो बेधडक बंकर च्या बाहेर धावला होता, आजूबाजूला काही धोका असू शकतो याची अजिबात परवा न करता..
का? का केले त्याने असे? त्याला माझा, आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा विचार मनात नाही आला का?
का केले त्यानं असे?
या प्रश्नाने भांडवून सोडले असतानाच तिच्या चिमुकल्या अगस्त्यचा रडवेला चेहरा बघून ती भानावर आली..
"कनिका काय करतेस तू? अगस्त्य समोर तू अशी असाह्य कमकुवत लाचार आई बनून राहणार आहेस का? की त्याच्यासमोर एका खंबीर, संकटांचा सामना कसा करायचा हे माहिती असणाऱ्या आईचे उदाहरण ठेवणार आहेस ?
नाही.... आणि तिने ठरवलं पुन्हा उभं राहायचं असं रडत बसून आपल्या हुतात्मा नवर्याचा अपमान नाही कयचा..
इंडियन आर्मीने जेव्हा प्रस्ताव दिला की आम्ही तुम्हाला आर्मी ऑफिसर बनण्याची संधी देऊ शकतो तेव्हा हाती असलेली नोकरी सोडून लष्करात जाण्यासाठी प्रयत्न करायचं तिने विचारपूर्वक ठरवलं.
तिला लष्कराची नोकरी किंवा लष्कराचा मान सन्मान असं काही नको होतं पण तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर हव होतं...
कौस्तुभने असं का केलं असावं? आणि केवळ त्यासाठी तिने तिचं नाव नोंदवलं..
आर्मीने फक्त वयोमर्यादा शिथिल केली होती निवडीचे बाकी सर्व निकष तिला पूर्ण करायचे होतेच आणि ती जोमाने तयारीला लागली.
परीक्षेतून निवड झाली पण खरी परीक्षा तिथून पुढे होती.
ओ टी ए च्या खडतर प्रशिक्षणामध्ये निष्ठुरपणा काय असतो ते तिने अनुभवलं..
पाठ सोलवटली... गुडघे फुटले... खांदे निखळले पण तिने तिचा निर्धार नाही सोडला.
५२ आठवड्यांचे अशक्य असे प्रशिक्षण पूर्ण करून जेव्हा तिच्या खांद्यावर दोन चांदण्या लागल्या तेव्हा मात्र मेजर कौस्तुभ राणे अभिमानाने तिच्या शेजारी उभे होते.....
खरंतर तिला उत्तम नोकरी होती इंजीनियरिंग आणि एमबीए झालेली कनिका एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्चपदस्थ नोकरीला होती अनेक वर्षांचा तिला अनुभव होता आणि चांगला पगारही होता...
ती नोकरी आणि एका हुतात्मा लष्करी अधिकाऱ्याची पत्नी म्हणून सगळं आयुष्य सुखात आणि सन्मानपूर्वक काढू शकली असती ती..
पण तिला मात्र तिच्या प्रश्नाचे उत्तर हवं होतं... असं काय असतं की घर बंगला गाडी संपत्ती प्रसिद्धी स्वतःचा बिझनेस अशा प्रकारची सर्व स्वप्न सोडून एक सैनिक देशासाठी वेडा होतो... प्राणांची आहुती देतो.
आणि आज कॅप्टन कनिका कौस्तुभ राणे म्हणतात मला त्या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे...
जी कधीकाळी पाच मिनिटांच्या प्रवासासाठी सुद्धा कार घेऊन जायची.. ऐशो आरामाचे आयुष्य जगत होती तिथपासून ते कौस्तुभच्या मृत्यूनंतर 40 किलो पर्यंत वजन उतरलेले असताना चेहरा काळवंडलेला असताना डोळे खोल गेलेले अंगात अजिबात त्राण नाही अशा अवस्थेतून जात आज डोंगराळ भागातून सुद्धा 40-40 किलोमीटर पळणारी अंगावर भारतीय सैन्यदलाचा गणवेश अभिमानाने मिरवणारी कॅप्टन कणिका कौस्तुभ राणे .... हा प्रवास जितका रोचक तितकाच प्रेरणादायी देखील आहे.
केवळ एक स्त्रीच स्वतःचे स्वप्न अर्धवट सोडून आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे दिव्य करू शकते.. ही समर्पणाची अत्युच्च भावना अभिमानाने मिरवण्यासाठी
जिवाची बाजी लावणार्या या नवदुर्गेला आजच्या सहाव्या दिवशी सादर प्रणाम
Interested to Take up Career in the Uniformed services ?
If you have the mettle to serve the nation through the armed forces then you may start your Proud March through either of the following ways
Various Entry Avenues for Indian Army
Comments
Post a Comment