Salute To Feminine Power : Navratri Day 4
"तू नोकरी सोडून हे सर्व करायचं म्हणतेस पण तुला जमेल का" नवऱ्याचा हा प्रश्न ऐकून मात्र ती पेटून उठली..
जमेल का म्हणजे काय?मी हे करूनच दाखवणार.
तिने नोकरी सोडून स्वतःचं काहीतरी करायचं हा निर्णय घेतला तेव्हा तिचं आयुष्य सुखात लोळण घेत होते.
अमेरिकेत स्वतःची उत्तम पगाराची नोकरी. नवरा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर.
नुकतीच तिच्या पोटी एक गोंडस मुलगी जन्माला आलेली.
एका भारतीय सर्वसाधारण स्त्रीला आणखी काय हवं असतं?
पण मधुरा ची गोष्टच निराळी होती.
सर्व सुखं हात जोडून उभी असताना तिने एक दिवस अमेरिकेत नोकरीचा राजीनामा दिला आणि झेप घेतली एका अशा विश्वात ज्याची तिला काहीच माहिती नव्हती, ज्ञान नव्हतं आणि अनुभवही नव्हता...
फक्त एक तीव्र इच्छा होती ती म्हणजे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची माहिती जगभरातल्या लोकांना उपलब्ध करून
द्यायची आणि त्यासाठी एक युट्युब चॅनेल सुरू करायचा...
हो बरोबर ओळखले तुम्ही.. आजची नवदुर्गा आहे मधुराज रेसिपीची मधुरा बाचल.
2009 मध्ये जगभरात महाराष्ट्रीयन पदार्थांची रेसिपी सांगणारा एकमेव आणि पहिला चॅनेल म्हणजे मधुराज रेसिपी.
कल्पना करा युट्युब सुरू होऊन जेमतेम चार वर्षे झालीत अजून त्यांचे Business Model स्थिरावले नव्हते आणि
मधुराने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून व्यवसायासाठी युट्युब चॅनेल चा मार्ग निवडला.. तिच्या Daring चे कौतुक
करावे तेव्हढे कमीच. त्यानंतरचा मार्ग सोपा नव्हता...
Video कसा बनवायचा याची माहिती घेण्यापासून ते सलग अठरा महिने व्हिडिओ अपलोड करेपर्यंत चा प्रवास
परीक्षा पाहणारा होताच...
मात्र तोपर्यंत जगभरातून प्रतिसाद यायला लागला आणि 18 महिन्यानंतर तिला पहिले पेमेंट 100 डॉलरचे युट्युब
कडून मिळाले....
त्यानंतर मात्र तिने मागं वळून पाहिलंच नाही. तान्ह्या मुलीला सांभाळत पहाटे पाच ते रात्री अकरा बारा एक दोन
कितीही वाजले तरी काम करत तिने तिचं कार्य वाढवत नेलं. पाच-सहा वर्षात हिंदी आणि मराठी चॅनल सुद्धा सुरू
केले आणि आज मधुरा लाखो करोडो महिला मुली आणि पुरुष खवय्यांची हक्काची मार्गदर्शक झाली आहे
2015-16 मध्ये भारतात परत आल्यानंतर तिने मधुराज रेसिपी मसाले लॉन्च केले तेव्हा रिसर्च एजन्सीज ने सांगितले
होते की पंधराशे पॅकेट विकायला साधारण सहा महिने तरी लागतील तुम्हाला...
असे असताना केवळ एका वेबसाईटवरून मधुराज रेसिपी मसाले लॉन्च केल्या केल्या चार तासात पंधराशे पाकिटे विकली गेली ती केवळ तिने मेहनतीने उभ्या केलेल्या मधुराज रेसिपी या मराठमोळ्या ब्रँडची जादू आहे.
वरवर परिकथा वाटू शकते असा प्रवास असलेल्या मधुराचे बालपण अत्यंत हलाखीत गेला आहे हे कदाचित
थोड्याच लोकांना माहिती आहे.
दहावीत असताना पुण्यातील एका वाड्यातील दहा बाय दहाच्या खोलीतून सामानासकट तिच्या कुटुंबाला बाहेर
फेकले गेल्यानंतर एका अर्धवट बांधकामाच्या पडक्या इमारतीमध्ये खालच्या बाजूला एका कोपऱ्यात पत्र्याचा
आडोसा निर्माण करून तिचं कुटुंब पन्नास स्क्वेअर फुट च्या जागेत राहिले आहे.. अवतीभवती दारू जुगार गुंडागर्दी
मारामारी अशा दररोजच्या वातावरणामध्ये अभ्यास करत तिने तिची दहावी पूर्ण केली.. एकदा तर एका गुंडाने
तिच्या गळ्याला सुरा देखील लावला होता त्याच पडक्या Building च्या टेरेस वर...
तिला सायन्सला जायचं असताना खर्च परवडणार नाही म्हणून तिने कॉमर्स घेतलं पण कॉलेज मात्र तिला नावालाच
करता आलं..
सकाळी सात ते नऊ असे दोनच तास तिने कॉलेज केलं आणि त्यानंतर नऊ ते सहा कुटुंबाला हातभार लागावा
म्हणून नोकरी आणि त्यानंतर मेहंदी लावण्यासारखे छोटे-मोठे व्यवसाय करत महिन्यासाठी 1000 ते 5000 रुपये
पर्यंत कमवित तिने स्वतःच्या आयुष्याला आकार दिला.
पुढे लग्नानंतरचा प्रवास मात्र सुखकर वाटत असला तरी तो वरकरणी सुखकर दिसतो..
क्षणोक्षणीची अनिश्चितता, पारिवारिक आणि सामाजिक दबाव, भीती, जबाबदाऱ्या सांभाळणे, हे सर्व करत या
नवदुर्गेने आज स्वतःचे स्वप्नवत असे विश्व उभे केले आहे.
हे सर्व करत असताना तुमच्या माझ्यासारखे - हे तुला जमेल का नाही? नाही चाललं तर काय? Procrastination,
Time Management पुरेशी माहिती नसणे असे अनेक प्रश्न तिने अगदी वैयक्तिक पातळीवर सोडवले आहेत.
अशी आहे आपली मराठमोळी मधुरा बाचल अक्षरशः शून्यातून हेवा वाटावा असं स्वतःचं विश्व तिने निर्माण केलं.
आहे ते सुद्धा एका अत्यंत साध्या वाटणाऱ्या व्यवसायामध्ये आणि म्हणूनच
आजच्या या चौथ्या दिवशी पिवळ्या रंगाच्या साक्षीने मधुरा बाचल या नवदुर्गे ला सविनय प्रणाम
मला माहिती आहे मधुरा बाचलचा हा youtuber प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटत असेल आणि आपण
सुद्धा Youtuber व्हावं असं तुम्हाला कदाचित वाटत असावं
Youtuber म्हणून करिअर करताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे युट्युब आता जगभरामध्ये
बऱ्यापैकी स्थिरावले आहे आणि जगभरातून लाखो लोक youtuber होऊन व्यवसाय करत आहेत. बर्याच
विषयांवर आधीच youtuber आहेत
त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे करायचे असेल तर मात्र नेहमीपेक्षा वेगळं आणि जास्त करायची तयारी ठेवली पाहिजे.
खालील गोष्टी आवर्जून मनाशी पक्क्या करा आणि मग Youtuber व्हायचा निर्णय घ्या
1. युट्युब वर तुम्ही नेमके काय करणार याचा निश्चित ध्येय ठरवा.
2. तुमचं एक अतिविशिष्ट असं कार्यक्षेत्र निवडा
3. तुमचं कंटेंट कॅलेंडर तयार करा
4. गुणवत्तेबाबत अजिबात तडजोड करायची नाही असं मनाशी पक्के ठरवा आणि ते प्रत्यक्षात उतरवा
5. तुमचं सादरीकरण उत्तम होईल याची काळजी घ्या
6. Smart SEO सारख्या साधनांचा वापर करा
7. तुमची युट्युब वरील Visibility वाढवण्यासाठी अन्य चॅनेल चा सुद्धा वापर करा
8. Content is King हे लक्षात ठेवून तुम्ही निवडलेल्या विषयावर तुमचं प्रभुत्व सिद्ध करा
9. अन्य ब्रँड्स बरोबर भागीदारी करा आणि
10. अन्य Youtubers बरोबर collaboration करा.
एक स्पष्ट ध्येय आणि दिशा
एक उत्तम सेवा अथवा प्रॉडक्ट- ज्यामध्ये समाजाच्या कोणत्यातरी एका गरजेचं समाधान द्यायचा तुम्ही प्रयत्न करा
तुमच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आणि कसं दिसावं याचा सतत अभ्यास करत रहा आणि त्याप्रमाणे तुमच्या स्क्रिप्ट
मध्ये बदल करत रहा हलक्या फुलक्या पद्धतीने तुमचा संदेश समाजापर्यंत पोचवून तुमचं वेगळेपण दाखवित रहा
मग मात्र यश तुमचंच आहे
एक उत्तम Youtuber होवून आनंदी आणि समाधानी होण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
Avinaash Deshmukh
Youth and Career Coach
9657600076
फारच प्रेरणादायी - Hat's off
ReplyDelete