I dont need a Career Counselor.. I know what to do..
आई..मला CA नाही व्हायचे.. intermediate परीक्षा नाही द्यावीशी वाटत मला .. सानिकाने आईवर बॉम्ब टाकला .. काय ? तू ठीक आहेस ना ? कविताने भाजी चिरता चिरता चाकू खाली ठेवला आणि हबकलेल्या चेहऱ्याने सानिका कडे बघितले.. सानिका अगं काय बोलतेयस.. काय झाले ? आई मला नाही करावासा वाटत CA चा अभ्यास आता. मनच लागत नाहये माझे .. बऱ्याच गोष्टी समजायला अवघड जाताहेत. हे बघ सानू.. धीर सोडू नकोस . अगं तू गेले तीन वर्षे अथक प्रयत्न करते आहेस. फाउंडेशन ला तुला किती चांगले मार्क पडले होते. मागचा इंटरचा attempt सुद्धा फक्त काही मारकांनी हुकला.. अजून थोडा जोर लावलास तर होशील तू CA.. नाही पण आता मला वाटते CA होण्यात आणि आयुष्यभर ते काम करण्यात मला अजिबात आनंद मिळणार नाही.. I won't be happy .. I will lead a stressful life . . सानिका कचरत बोलून गेली .. अगं पण तूच ठाम होतीस ११वी मध्ये ..मला CA करायचंय म्हणून .. तुझे पप्पा तू science घेऊन इंजिनिअर व्हावी म्हणून किती मागे लागले होते तुझ्या .. पण तुझ्या हट्टापुढे ते नमले .. आता ते काय म्हणतील ? कि...